Saturday, March 28, 2020

Corona

कोरोना’वर लस शोधली? हैदराबादच्या शास्त्रज्ञाचा दावा

एखादी लस शोधण्यासाठी 15 वर्ष लागतात. मात्र शक्तिशाली कम्प्यूटेशनल टूल्सच्या साह्याने त्यांनी 10 दिवसांमध्ये ही लस शोधून काढली असा दावा विद्यापीठाने केला आहे.


हैदराबाद 28 मार्च : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. कोरोनावर ‘लस’च नसल्याने सगळं जग चिंतेत आहे. लस शोधण्यासाठी त्यावर संशोधनही सुरू आहे. जगभरातल्या सर्व संस्था, शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हैदराबाद विद्यापीठाच्या एक संशोधक सीमा शर्मा यांनी त्यावर ‘लस’ शोधल्याचा दावा केलाय. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून संशोधनाची महिती दिली आहे.
सीमा शर्मा या हैदराबाद विद्यापीठाच्या बायो केमेस्ट्री डिपार्टमेंटच्या स्कूल ऑफ लाइफ साइंसेजच्या सदस्य आहेत.
टी सेल एपिटोप्स असं त्या लसीला नाव देण्यात आलंय. कोरोनाच्या वाढीला यामुळे अटकव होऊ शकतो असा त्यांनी दावा केलाय. सगळ्या लोकांसाठी या लसीचा उपयोग होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र या लसीच्या आणखी टेस्टींग करण्याची गरज आहे. त्यानंतरच त्याविषयी निर्णय घेता येईल असही त्यांनी म्हटलं आहे.

जगभरातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर भारतात (India) 800 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र चीनमध्ये ठिक झालेल्या रुग्णांना या व्हायरसची पुन्हा लागण झाल्याचं समोर आलं आहे, शिवाय काही कोरोनाग्रस्तांमध्ये याची लक्षणंही दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित भारतातील हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी आता कदाचित कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी सिरोलॉजिकल टेस्ट (serological test) म्हणजे रक्तचाचणी केली जाऊ शकते.

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) सिरोलॉजिकल टेस्टसाठी 15 लाख अँटिबॉडी किट्ससाठी कोटेशन मागवलं आहे. या किट्सचा उपयोग रिसर्च, मॉनिटरींग आणि तपासणीसाठी होऊ शकतो. रक्तातील अँटिबॉडीजमुळे किती लोकं व्हायरसच्या संपर्कात आलेत ते समजू शकेल.

काय आहे सिरोलॉजिकल टेस्ट?
शरीरात एखाद्या व्हायरसने किंवा पॅथोजनने हल्ला केल्यानंतर शरीर त्याच्याशी लढतं. पॅथोजनला अँटिजनही म्हणतात.  हे फॉरेन पार्टिकल म्हणजे शरीराच्या बाहेरील घटक असतात, ज्यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज पॅथोजनवर हल्ला करतात. आणि त्यांना कमजोर बनवतात त्यामुळे आपण निरोगी राहतो आणि म्हणूनच एकदा झालेला आजार पुन्हा झाल्यास आपल्यावर त्याचा परिणाम कमी होतो.